Type Here to Get Search Results !

सांगलीत आरटीओ एजंटची हत्या; पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला!




सांगली : सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील हरिपूर येथील सुरेश नांद्रेकर (वय 47 वर्ष) यांची हत्या करण्यात आली आहे. नवरा बायको वर जीवघेणा हल्ला  झाल्याची घटना समोर आली आहे.  याहल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सुरेश नांद्रेकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते आरटीओ एजंट म्हणून काम करत होते. सांगलीच्या हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. तरुणांच्या घोळक्याने पती-पत्नीवर जीवघेणा  हल्ला केल्याचा आरोप आहे. 


घटनास्थळ व मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा हरिपूर रस्त्यावरील गजानन कॉलनीत नांद्रेकर यांच्या शेताजवळ हा प्रकार घडला आहे. तिघा हल्लेखोरांनी डोक्यावर आणि तोंडावर वार करुन त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.टोळक्याच्या हल्ल्यात पतीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणारी सुरेश नांद्रेकर यांची पत्नीही यात जखमी झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.



दुचाकी चोरीला गेल्याच्या कारणावरुन नुकताच त्यांचा वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातूनच हि हत्या झाल्याची शक्यता दाखवली  जात आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies