Type Here to Get Search Results !

चेहऱ्याच्या ‘या’ भागात दुखत असेल तर हृदयविकाराची लक्षणे असू शकतात!




आटपाडी: आजकाल तरुण असो किवा वृद्ध, प्रत्येक वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, त्यामुळे तुम्ही खूप गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जबडा दुखणे हे ‘सौम्य हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण देखील असू शकते. जर छातीत दुखणे, अस्वस्थता आणि घाम येणे अशी समस्या असेल तर ही देखील हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. 



मिळालेल्या माहितीनुसार, जबड्याच्या मागच्या भागात दुखणे हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण असू शकते. यामध्ये वेदना जबड्यापासून सुरू होऊन मानेपर्यंत पसरते. ही वेदना खूप अचानक होते. हातात मुंग्या येणे.



तसेच, हात दुखणे किंवा हाताला मुंग्या येणे हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण आहे. ही वेदना छाती आणि मानेपर्यंत वाढू शकते. जर तुम्हाला रात्री अचानक घाम येऊ लागला तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका.



त्याचप्रमाणे, पायर्‍या चढल्यानंतर जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला तर तुमचे हृदय नीट काम करत नसल्याचे समजते. तसेच, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि छातीत दुखणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.



आणि ढेकर येणे व पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवणे हे हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies