Type Here to Get Search Results !

मुलाखती संपल्यानंतर तासाभरात एमपीएससीकडून निकाल जाहीर; इतिहासात पहिल्यांदाच कमी वेळात निकाल जाहीर!





महाराष्ट्र: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जया ठाकरे यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी मुलाखती संपल्यावर एका तासात निकाल जाहीर करण्यात आला आहे.



“मुलाखती संपल्यावर एका तासात निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या कमी वेळात निकाल जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे,” असे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले.





एमपीएससीकडून ७४ पदांसाठी २२७ उमेदवारांच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मुलाखतींची प्रक्रिया आज संपली आहे. त्यानंतर एमपीएससीकडून प्रक्रिया पूर्ण करून लगेचच निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांच्या अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे, प्रमाणपत्रांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. ही गुणवत्ता यादी न्यायालयात दाखल विविध न्यायिक प्रकरणांतील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय निवडण्यासाठी उमेदवारांना ३१ मार्च ही अखेरची मुदत आहे. ऑनलाइन पद्धतीशिवाय अन्य कोणत्याही पद्धतीने पर्याय ग्राह्य धरला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies