Type Here to Get Search Results !

ऑस्कर पुरस्कार म्हणून मिळणारी ट्रॉफी सोन्याची नसून ‘या’ धातूची असते!






नवी दिल्ली: कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. अँड द ऑस्कर गोज टू…हे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुरलेले असतात. ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी सोनेरी रंगाची असते. त्यामुळे तिला सोनेरी बाहुली असेही ओळखले जाते. ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. 




प्राप्त माहितीनुसार, ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या विजेत्या कलाकारांचे मानधन तीन ते चार पटीने वाढते. त्यांच्या मानधनात जवळपास ८१ टक्क्यांनी वाढ होते. परंतु, एखाद्या अभिनेत्याच्या मानधनातच इतक्या टक्क्यांनी वाढ होते. अभिनेत्रींच्या मानधनात त्या तुलनेत कमी वाढ होते.




ऑस्कर पुरस्कारात मिळणारी सोनेरी बाहुली म्हणजे ट्रॉफी तांब्याची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावला जातो. परंतु, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, धातूच्या कमतरतेमुळे तीन वर्ष ऑस्कर ट्रॉफी रंग लावलेल्या प्लॅस्टरमध्ये तयार करण्यात आली आहे.




तसेच, ऑस्कर पुरस्कारावर दरवर्षी अब्जावधी रुपये खर्च केले जातात. या ट्रॉफीची किंमत त्यावेळीच्या तांबे आणि सोन्याच्या किंमतीवर अवलंबून असते. तर दरवर्षी या एका ट्रॉफीची निर्मिती करण्यासाठी ४०० डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास ३१ हजार रुपये खर्च येतो.




अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नियमानुसार, कोणत्याही विजेत्याचा ऑस्कर ट्रॉफीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो. त्यामुळे विजेत्याची इच्छा असली तरी तो ही ऑस्कर ट्रॉफी विकू शकत नाही. जर विजेत्याला ती ट्रॉफी विकायची असेल तर त्याला सर्वात आधी ती अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सला विकावी लागते. तसेच, अकादमी फक्त १ डॉलरला ऑस्कर ट्रॉफी विकत घेते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies