Type Here to Get Search Results !

लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन पोलीस मित्रांना अटक!




देहूरोड: महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स या नावाने आयडी बाळगणाऱ्या पोलीस मित्रांनी एका तरुणास एक लाखाचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती तरुणाने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्‍ये शनिवारी रात्री करण्‍यात आली. रोशन संतोष बागुल, गायत्री रोशन बागुल, पूजा विलास माने असे अटक केलेल्या तिघांची नांवे आहेत. याप्रकरणी विन्सेंट अलेक्झांडर जोसफयांनी फिर्याद दिली आहे.



रोशन बागुल हा जोसफ यांच्याकडे एक लाखाची खंडणी मागून त्यांना त्रास देत होता. त्यानंतर जोसफ यांनी याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना सांगितली. त्यानुसार कृष्णप्रकाश यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी हॉटेल पुणे गेट येथे सापळा लावला. ५०० रुपयाची एक खरी नोट वरतीलावून त्याच्या आत मुलांच्या खेळण्यातील नोटा लावून एक लाखाचा बंडल तयार केला. दरम्यान, पैसे घेण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक.  दोघे जण पसार झाले.



रोशन बागुल याने जमिनीचे व्यवहार करत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स असे लिहिलेले बनावट आयकार्ड मिळाले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी ही कारवाई केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies