Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेस सुरुवात; जाणून घ्या सविस्तर माहिती.

 



नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेस अखेर रविवारपासून सुरुवात झाली. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर मार्च २०२० मध्ये नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.


उन्हाळी सुट्ट्यांसाठीचे हवाई सेवेचे वेळापत्रक आजपासून कार्यान्वित झाले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत या वेळापत्रकानुसार हवाई सेवा चालविली जाईल. उन्हाळी सुट्टीच्या काळात मॉरिशस, मलेशिया, थायलंड, तुर्की, अमेरिका, इराक आदी देशांसाठी १ हजार ७८३ फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत इंडिया सलाम एअर, एअर अरेबिया अबुधाबी, क्वांटास, अमेरिकन एअरलाईन्स या विमान कंपन्या प्रथमच भारतात सेवा देणार आहेत, असेही हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies