Type Here to Get Search Results !

.. तर देश उद्ध्वस्त होईल; असा यांनी केला इशाराबंगळूरु : कर्नाटकमध्ये हिजाब वादानंतर हलाल मटणवरुन नवीन वाद सुरु झाला आहे. उजव्या विचाराच्या संघटनांनी मंदिर यात्रोत्सवात मुस्लिम व्यापाऱ्यांवर प्रतिबंध लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर बायोकाॅनच्या प्रमुख किरण मजुमदार शाॅ यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना इशारा दिला की राज्यात वाढत चाललेला धार्मिक द्वेष लवकर जर थांबवला नाही तर यात देश उद्ध्वस्त होईल. कर्नाटकातील भाजप सरकारने मजुमदार यांच्यावर राजकीय रंग देण्याचा आरोप केला आहे. कर्नाटक सरकारकडून मंदिर परिसरात बिगर हिंदूंना व्यापार करण्यास बंदी घालणाऱ्या नियमाचा हवाला देत काही दिवसानंतर किरण शाॅ यांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली होती.भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी किरण मजुमदार यांना सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, त्यांचे मत पूर्वग्रह दुषित आहे. हे दुर्दैवीआहे, की किरण शाॅ सारखे लोक आपले व्यक्तिगत, राजकीय मत रंगून मांडतात. त्यास आयटीबीटी क्षेत्रातील भारताचे नेतृत्वाची साथ मिळते. राहुल बजाज यांनी ही एकदा गुजरातसाठी असे विधान केले होते. ते राज्य एक प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र बनले आहे. जाऊन तेथील आकडे तपासा, असा सल्ला मालवीय यांनी शाॅ यांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies