Type Here to Get Search Results !

जुन्या वादातून तरूणाचा पोटात चाकू खुपसून हत्या!




जळगाव: जुन्या वादाचा राग मनात धरून पोटात चाकू खुपसून एकाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे बुधवारी  उघडकीस आली आहे. सतीश साहेबराव सोनवणे असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी प्रविण राजू सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संजय साहेबराव सोनवणे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



प्रविण राजू सोनवणे हा गेल्या दोन महिन्यापासून खरजई येथे आत्याकडे राहत होता. काही दिवसापूर्वी त्याने खरजई गावातील पिंटू शिंदे या तरूणास मारहाण केली होती. या मारहाणीवरून प्रविण व मयत सतीश यांच्यात वाद सुरू होता. बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास सतीशने प्रविणला मारहाणीवरून विचारपूस केली. त्याचा राग येऊन प्रविणने सतीशला शिवीगाळ केली. त्यावेळी सतीशच्या पत्नीने माझ्या पतीस शिवीगाळ का करत आहेस, असे विचारले असता प्रविणने तिलाही कानाखाली मारली.



पत्नीला मारहाण केल्यावरून सतीश सोनवणे व प्रविण सोनवणे यांच्यात झटापटी झाली. यावेळी प्रविणने आपल्या खिशातून चाकू काढून सतीशच्या पोटात  भोसकले. तसेच छातीच्या उजव्या बाजूने दोन ते तीन वेळा भोसकून गंभीर जखमी केले. जबर वार झाल्याने सतीश जमिनीवर कोसळला. हे पाहताच प्रविण तेथून पळून गेला. या घटनेनंतर सतीशच्या भावाने त्याला तत्काळ दुचाकीवरून शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरानी ग्रामीण रूग्णालयात नेण्यास सांगितले. ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतीश यास मृत घोषीत केले.  प्रविण सोनवणे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies