Type Here to Get Search Results !

चालत्या ट्रेनच्या तीन बोगी झाल्या वेगळ्या…..!बेलदाः बेलदा स्टेशनवरुन निघालेल्या फलकनुमा एक्सेप्रेसचा मोठा अपघात होता होता टळला. मोटरमनने लक्ष दिल्याने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही. शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास फलकनुमा एक्सप्रेस बेलदा स्टेशनपासून ओरिसाच्या  दिशेने जात असताना रेल्वेच्या मोटरमनला काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर दंतन गेटच्या जवळ कसला तरी आवाज आल्याचेही मोटरमनला जाणवले. म्हणून ज्यावेळी त्या आवाजाच्या दिशेन पाहण्यात आले त्यावेळी लक्षात आले की, मुख्य रेल्वेच्या डब्यापासून गाडीच्या तीन बोगी वेगळ्या झाल्या आहेत. त्यानंतर तात्काळ गाडी थांबवून चाळीस मिनिटानंतर रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. मात्र काही वेळातच फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन बोगी अचानक वेगवेगळ्या झाल्या.


मेदिनीपूर जिल्ह्यातील खरगपूर विभागातील बेलदा स्टेशनजवळ ही घटना घडली. रेल्वेची ही घटना घडल्यानंतर स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालत्या ट्रेनच्या तीन बोगी वेगवेगळ्या झाल्यानंतर 25 पैकी तीन बोगी वेगळ्या करण्यात आल्या होत्या. मात्र या घटनेमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.


मुख्य इंजिनपासून वेगळ्या झालेल्या बोगींची पाहणी करुन ती समस्या सोडवून ही ट्रेन पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. यावेळी रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, यांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीबीसीचे कुलूप उघडले होते. त्यामुळे ही घटना घडली, मात्र कोणतीही मोठी दुर्घटना यामुळे झाली नाही.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies