Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या “या” खासदार हरवल्या; पोलिसांकडे तक्रार केली!





यवतमाळ: भाजपा महिला आघाडीने स्थानिक खासदार भावना गवळी या हरवल्या संदर्भात यवतमाळ शहर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवल्यापासून भावना गवळी जनतेसमोर आलेल्या नाहीत. त्यामुळेच भावना गवळी यांचा शोध घ्यावा अशी तक्रार भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.



भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला कार्यकर्त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कालपासून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसंपर्क अभियानच्या दुसऱ्या दिवशीच यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी हरविल्या आहेत,असे भाजपाने उठवले आहे. ईडीच्या नोटीसीनंतर भावना गवळी मतदारसंघात फिरकल्या नाही त्यामुळेच यवतमाळ शहर पोलीस ठाण्यामध्ये खासदार हरविल्या असल्याची मागणी करणारी तक्रार भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies