Type Here to Get Search Results !

शाळेला चाललेल्या बहीण-भावाचा, अपघातात मृत्यू!

 





कर्जत : शाळेत चाललेल्या बहीण-भावाचा ‘पिकअप गाडीने ’ समोरून दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. ही घटना नगर-दौंड महामार्गावरील सोनवडी शिवारात भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्याजवळ काल , गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली . मुलीचे नाव अनुष्का गणेश शिंदे तिचे वय १६  वर्षे  व मुलाचे नाव आदित्य गणेश शिंदे त्याचे वय १४ वर्षे अशी मृत बहीण-भावाची नावे आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु या गावातील रहिवासी होते.



 या मुलांचे वडील पेंटिंगची कामे करत असून, या गरीब कुटुंबावर संकटच कोसळले. निमगावसह परिसरावर शोककळा पसरली. सकाळी हे बहीण-भाऊ दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निमगाव खलु येथून दौंडकडे जात असताना ‘हॉटेल धनश्री’समोर जुन्या टोल नाक्याजवळ दौंडहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ‘पिकअप व्हॅन’ने एका टेम्पोला मागे टाकण्याच्या नादात त्यांना समोरून जोराची धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने ते मृत्युमुखी पडले. दौंड पोलीसांचा तपास सुरु आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies