Type Here to Get Search Results !

व्यावसायिकाला लोकलमधील चुंबन पडले महागात....!

 



मुंबई : हार्बर लाईनवरील लोकल प्रवासात महिलेचा किस घेणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. प्रवासात तोल जाऊन चुकून किस घेण्याचा प्रसंग घडल्याचा दावा करणार्‍या व्यावसायिकाला महानगर न्यायदंडाधिकार्‍यांनी एक वर्षाच्या सश्रम कारावासा सह 10 हजारांचा दंडही ठोठावला. 2015 मध्ये घडलेल्या घटनेत न्यायदंडाधिकारी व्ही. पी. केदार यांनी 37 वर्षीय आरोपी व्यावसायिक किरण होनावर याला दोषी ठरवले. हार्बर मार्गावरील लोकलच्या जनरल डब्यात त्याने महिलेचे चुंबन घेतले होते. त्याने हा आरोप फेटाळून लावला होता. लोकलमधून प्रवास करताना महिलेला धक्का लागला आणि तोल जाऊन चुकून महिलेच्या गालाला माझ्या ओठाचा स्पर्श झाला, असा युक्तीवाद आरोपी किरण होनावारतर्फे करण्यात आला होता.



मात्र तक्रारदार महिलेने आरोपी तिच्यासमोरील सीटवर बसला होता व  तिच्याकडे पाहत होता, असे म्हणणे तक्रारीतून मांडले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. पुरुषांच्या तुलनेत महिलांना समोरच्या व्यक्तीचा हेतू चटकन लक्षात येतो. महिलांमध्ये गैरमौखिक इशारे समजण्याची जन्मजात क्षमता असते. ती अगदी लहान तपशीलसुद्धा पटकन वाचते. त्यामुळे महिलेने अनावधानाने घडलेल्या चुकीविरोधात तक्रार केली, असे म्हणता येणार नसल्याचे मत न्यायालयाने निकाल देताना व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies