Type Here to Get Search Results !

विभागीय क्रीडा संकुलान अतिरिक्त 26 कोटी रुपये

 


 विभागीय क्रीडा संकुलाचा  विस्तार आणि खेळाडूंना अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर २६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाच्या कामांचा सुधारित प्रस्ताव पाठवून प्रलंबित कामे गतीने करावी , अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्हा  यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.


 जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी  विभागीय क्रीडा संकुलाची बैठक झाली श्री. भुजबळ म्हणाले, की विभागीय संकुलाच्या विस्तारीकरण व श्रेणीवाढ करण्याच्या अनुषंगाने संकुलाच्या बांधकाम योजनांच्या अनुदान मर्यादेत राज्यशासनाकडून वाढ करण्यात आली आहे. क्रीडा संकुलाची कामे करण्यासाठी जस जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे तत्काळ कामे करण्यात यावी. तसेच संकुलाच्या निर्मितीकरिता पुरेशाप्रमाणात निधी उपलब्ध होण्यासाठी सचिवांशी चर्चा करण्यात आली असून, उर्वरित २६ कोटींच्या निधीचा आराखडा लवकरच सादर करण्यात यावा. तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुले विकसित करताना हॉकी मैदान, शूटिंग रेंज यासारख्या खेळांचाही विचार करण्यात आले.


   विभागीय क्रीडा संकुलाच्या बाजूची २९ एकर जागा क्रीडा प्रयोजनासाठी राखीव आहे. ही जागा विभागीय क्रीडा संकुलाला अधिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वयाने कार्यवाही करावी.तालुका पातळीवरील क्रीडा संकुलाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने कसा होईल याबाबत क्रीडा विभागाने नियोजन करावे, जेणेकरून ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies