देवकीने शेअर केला लेकीसोबतचा पहिला फोटो, पाहा बाळाची पहिली झलक 'सुख म्हणजे नक्की काय असतं'या मालिकेत‘सुख म्हणजे नक्की काय असतं’  या लोकप्रिय मालिकेतील देवकी अर्थात ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोडच्या घरी एका सुंदर मुलीचे  आगमन झालं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’  या लोकप्रिय मालिकेतील देवकी अर्थात ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोडच्या घरी एका सुंदर मुलीचे आगमन झालं आहे. नुकताच तिने मुलीला जन्म दिला. या गोड बातमीनंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. मिनाक्षी राठोडचा पती कैलास वाघमारेनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने बाळाच्या पायांचे ठसे असलेला एक फोटो शेअर केला. त्याला कॅप्शन देताना त्याने ‘माय गोडगोजिरी होऊन परत आली’, असं म्हटलं आहे.

यानंतर मिनाक्षीने आता बाळाचा पहिला फोटो सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या लेकीचा चेहरा नीट दिसत नाही. सगळयांनी किती प्रेमाने माझं स्वागत केलेय ! नक्कीच हे जग खूप प्रेमळ असावं! थैंक्यू .., असे कॅप्शन तिने या फोटो पोस्ट करताना दिले आहे.  मीनाक्षी सोशल मीडियावर प्रचंड अॅेक्टिव्ह आहे. प्रेग्नंसीच्या काळात तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे चिक्कार फोटो शेअर केले होते. यामुळे ती सतत चर्चेत होती. मीनाक्षी उत्तम अभिनेत्री आहेच. पण तिचा नवरा कैलाश हादेखील एक उत्तम अभिनेता आहे. दोघांनी कॉलेजमध्ये असतानाच अभिनय प्रवासाला सुरूवात केली होती.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत मीनाक्षीनं साकारलेली देवकीची भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. काहीशी वेंधळी, मनानं तशी स्वच्छ पण कुणाच्याही सांगण्यावरून वाईट वागणारी देवकी तिनं अप्रतिम साकारली. अगदी नवव्या महिन्यापर्यंत मीनाक्षी काम करत होती. गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच तिने कामातून ब्रेक घेतला होता. तिच्या जागी देवकी म्हणून भक्ती रत्नपारखी दिसत आहे.

2018 मध्ये मराठी मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधून मीनाक्षीने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. 2020 मध्ये तिला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका मिळाली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured