Type Here to Get Search Results !

आज १११ जोडपे होणार विवाहबद्ध



वाई: आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्यात १११ जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 


या प्रतिष्ठानच्या वतीने तीन वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास नवदाम्पत्य संसारोपयोगी साहित्यही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येते. या वर्षी शनिवारी दुपारी १२.३५ वाजता वाई गोरक्षनाथ येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते श्री. पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार राजू पाटील नवघरे आदींची उपस्थिती राहणार आहे.


पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सिंहावलोकन पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी दुपारी एक वाजता कारखाना साइटवर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केले आहे. नापिकी, वाढती महागाई आणि लग्नात होणारा खर्च. यामुळे मुलींच्या वडिलांचे आर्थिक गणित बिघडून जाते. अनेकांवर वडिलोपार्जित शेती विकून, व्याजाने पैसे काढून मुलीचे लग्न करण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत वधूपिता पार खचून जातो. त्यामुळे तीन वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा घेत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies