Type Here to Get Search Results !

गेल्या २४ तासांत देशातील कोरोना रुग्ण संख्येत घट



कोरोनासंदर्भात देशवासियांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत घसरल्याचं दिसून येत आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 706 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे.


 देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर पोहोचली असून सध्या भारतात 17 हजार 698 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत दोन हजार 70 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रविवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 2 हजार 70 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4, कोटी 26 लाख 13 हजार 440 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या 25 नवीन मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, आरोग्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दिल्लीत रविवारी 357 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील कोरोना रुग्ण सकारात्मक दर 1.83 % आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकही नवीन मृत्यू झालेला नाही. तर रविवारी महाराष्ट्रात 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये एकूण 324 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या 24 तासांत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 % इतका आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies