Type Here to Get Search Results !

सलग तीन दिवश शेअर बाजारात घसरण

 



आज बुधवारीही सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरण कायम पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स 75.91अकांनी खाली घसरला तर निफ्टीने 16,230 वर आहे. शेअर बाजारात गेल्या दोन दिवसापासून अस्थिरता कायम आहे.


मंगळवारीही शेअर बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात बंद झाला. संमिश्र जागतिक संकेतांमुळे एफएमसीजी आणि बँक वगळता सर्व सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. शेवटी, सेन्सेक्स 105.82 अंकांनी अर्थात 0.19 टक्क्यांनी घसरून 54,364.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 61.80 अंकांनी अर्थात 0.38 टक्क्यांनी घसरून 16,240.05 वर बंद झाला.


सेंट्रल बँकेने चलन विनिमय करूनही, कमजोर झालेल्या रुपयामुळे आयटी स्टॉकवर दबाव होता असे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन यांचे म्हणाले. पण, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मेटल स्टॉकमध्ये मोठी घसरण दिसून आली. मेटल इंडेक्स 5 टक्क्यांहून अधिक घसरला.


आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies