Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे ‘त्या’ विधानावरून पलटले ; म्हणाले मला तसे म्हणायचे नव्हते



मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले आमदार बंडावर कायम आहेत. त्यांनी आपल्यावतीने कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना दिला आहे. यामुळे शिंदेंची हिंमत वाढली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. अशात एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य आले आहे. त्यांच्या वक्तव्याने बंडखोर आमदारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.


एकनाथ शिंदे हे आमदारांशी संवाद साधताना ‘एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे’ असे म्हणाले होते. काहीही झाले तरी आम्ही जिंकू. सर्व सुख आणि दुख आपलेच आहे, असेही म्हणाले होते. मी एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे असे म्हटले तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शक्ती असे म्हणायचे होते, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हणाले. यामुळे शिंदे हे आपल्या पूर्वीच्या विधानावरून पलटी मारली आहे. 


‘आम्ही घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. तुमच्याकडे आमची सर्व शक्ती आहे. तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही निराश करणार नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तेव्हा ती दिली जाईल, असेही आश्वासन पक्षाने दिल्याचे एकनाथ शिंदे आमदारांना सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये (video) दिसले’, मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies