Type Here to Get Search Results !

सभासदांचे हित, बँकेचे स्थैर्य यासाठीच प्रामाणिकपणे काम करणार : हैबतराव पावणे



आटपाडी : सभासदांचे हित तसेच काटकरीने कारभार करून बँकेचे स्थैर्य  यासाठीच प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन पुरोगामी सेवा मंडळाचे उमेदवार  हैबतराव पावणे सभासदासमोर बोलताना केले.


पुढे बोलताना ते म्हणाले, शिक्षक बँकेत पुरोगामी सेवा मंडळ सत्तेत येताच  सर्वच कर्जाचे व्याजदर 1 अंकी करणार असून मयत सभासदास संपूर्ण कर्जमाफी व दोन अंकी लाभांश देण्याचा प्रयत्न करणार आहे. शिक्षकांच्या मेडिक्लेम योजना राबवणार असून डीसीपीएस बांधवांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याबरोबरच शिक्षकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार आहे.


शुभमंगल योजने बरोबरच सभासद हिताच्या योजना राबवणार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासाहेब झुरे, दिपक कुंभार, भास्करराव डिगोळे, यशवंत मोरे, विठ्ठलपंत माळी, दिनेश माने, हरि जावीर, बाळासाहेब साळुंखे, रवींद्र सावंत, सुभाष सुतार, सचिन त्रिगुणे,  सचिन सासणे, संतोष पिसे, भिमराव शिंदे  आदी शिक्षक बांधव उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies