Type Here to Get Search Results !

म्हसवड : अहिंसा पतसंस्थेचा सन्मान



म्हसवड/प्रतिनिधी : सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकारातून सेवा करणाऱ्या अहिंसा पतसंस्थेचा सन्मान चिन्ह देऊन नुकताच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


 यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचे हस्ते अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांना पतसंस्था सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, र्व संचालक व  फेडरेशनचे मुख्य व्यवस्थापक क्षीरसागर साहेब, जिल्ह्यातील पतसंस्थांचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies