Type Here to Get Search Results !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार; 10 मंत्री घेणार शपथ!

 


मुंबई - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 मंत्री घेणार शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचे पाच तर आणि भाजपचे पाच मंत्री शपथ घेणार आहेत. अधिवेशनाच्या तोंडावर असल्याने आधी 10 मंत्र्यांना शपथ देण्यात येणार असून त्यानंतर अधिवेशन संपले की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू असून, शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रीमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आता लवकरच शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पाडणार आहे. त्यामुळे १८ जुलैला राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक झाली की १९ जुलै रोजी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाला वेग येणार आहे.गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील. तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग आदी क्षेत्रे मिळण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies