Type Here to Get Search Results !

१५ वर्षीय विद्यार्थ्याला अमेरिकी कंपनीकडून '33 लाख' पगाराची ऑफर!



नागपूर: नागपूरच्या १५ वर्षीय वेदांत देवकाते याला अमेरिकन कंपनीने वर्षाला तब्बल ३३ लाख रुपये पगाराची ऑफर दिली आहे. वेदांतने न्यू जर्सी येथील इन्फोलिंग्ज या जाहिरात कंपनीच्या स्पर्धेत भाग घेतला होता. जगभरातील एक हजार स्पर्धकांपैकी तो एकमेव विजयी ठरला. मात्र, तो केवळ १५ वर्षाचा असल्याने त्याला ती नोकरी स्वीकारता आला नाही. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, नागपुरातील १५ वर्षीय वेदांत देवकाते हा मध्यम वर्गीय कुटुंबातील एक सामान्य पण कुशाग्र बुद्धीचा मुलगा आहे. वेदांतची आई सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर वडील इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक आहे. वेदांतने संगणकाचे धडे त्याच्या आईकडून घेतले. लॉकडाऊन काळात आई ऑनलाईन क्लासेस घ्यायच्या. आई शिकवत असताना तो डोकावून बघायचा, विचारायचा आणि त्यातूनच त्याला संगणक आणि सॉफ्टवेअरबद्दल आवड निर्माण झाली. वेदांतने animeeditor.com नावाची वेबसाइट तयार केली आहे. ही वेबसाइट YouTube सारखे व्हिडिओ अपलोड करण्याचा पर्याय देते. यात ब्लॉग, चॅटबॉक्स, व्हिडिओ पाहण्याचे प्लॅटफॉर्म यासारख्या वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. या वेबसाइटवर प्रोफाइल एडिट करता येतात. लाइव्ह फॉलोअर्स आणि लाईक्स मिळवण्याचाही एक मार्ग आहे, असे वेदांत म्हणाला.



अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील इन्फोलिंग्ज या जाहिरात कंपनीने सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासंदर्भात एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत वेदांतने भाग घेतला आणि देशभरातील १ हजार सहभागी स्पर्धकांपैकी पहिला क्रमांक पटकावला. कंपनीने त्याला वर्षाला ३३ लाख पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. मात्र, तो केवळ १५ वर्षांचा असल्याचं कळल्यावर त्याला १८ वर्षांनंतर तू कंपनी जॉइन करू शकतो असं कळवलं.



वेदांत सध्या दहावीत आहे. तो लॅपटॉप आणि मोबाईलवर अधिक राहत असल्यानं त्याच्या वडिलांनी लॅपटॉप आणि मोबाईल लपवून ठेवला. मात्र, रात्री घरचे झोपल्यावर तो अभ्यासासोबत लॅपटॉपवर सॉफ्टवेअरसंबंधी काम करायचा. त्यातून त्याचा अनुभव अधिक वाढत गेला. त्याने लॅपटॉपचा चांगल्या कामासाठी उपयोग केला आणि त्यातूनच त्याने इतकी मोठी उपलब्धी कामविल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.(सौ.साम)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies