Type Here to Get Search Results !

सावधान ! देशात 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात!



नवी दिल्ली : देशात कोरोनाचे 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर यादरम्यान 38 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 


दरम्यान, नव्याने बाधित आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,38,262 वर पोहोचली आहे. तर दैनंदिन सकारात्मकता दर आता 4.32% टक्के इतका झाला आहे.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 हजार 678 नव्या रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तीन हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी 3238 जणांनी कोरोनावर मात केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies