जालना:४ वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विनोद पैठणकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, 12 डिसेंबर 2017 रोजी शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी 6 ते 8.30 वाजेच्या दरम्यान सदर घटना घडली. आरोपी विनोद पैठणकर हा 4 वर्षाच्या मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून मोटारसायकलवरून मुलीचे अपहरण करून तिला मुक्तेश्वर तलाव परीसरात घेऊन गेला. त्यानंतर तिला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, लैंगिक अत्याचार प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.