Type Here to Get Search Results !

आटपाडी : राजेवाडी येथे गळफास घेत पती-पत्नी आत्महत्या



आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे पती-पत्नीने गळफास घेत आत्यहत्या केल्याची दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजेवाडी येथील करण हेगडे व पत्नी शीतल हेगडे यांच्या लहान मुलीचा तीन-चार दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. तर त्यांच्या भावकीतील एकाचा तक्रारीवरून त्यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.


गुरुवादी (दि. ३०) रोजी त्यांनी राजेवाडी काळामळा येथील कानिफनाथ मंदिरालगत असणाऱ्या झाडाला एकाच दोरीने करण हेगडे व शीतल हेगडे यांनी गळफास घेत आत्महत्या केली.  लहान मुलीचा मृत्यू व पोलीस स्टेशनच्या तक्रारी यामुळे हेगडे पती-पत्नीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. सदर घटनेने हेगडे कुटुंबीय त्सेस राजेवाडी गावावर शोककळा पसरली असून आटपाडी येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies