Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य - 4 जुलै 2022 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस



मेष - आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी कामात यश मिळेल. 


वृषभ - चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल.आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर सरकारी कामात यश व फायदा मिळेल. 


मिथुन - आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. आज आपणाला काही लाभ होण्याची शक्यता आहे. 


कर्क - आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. असंतोषाच्या भावनेने मन घेरले जाईल. 


सिंह - आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील व वडीलधार्यांभ कडून लाभ होईल. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. 


कन्या - राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. अचानक धनखर्च होईल. नोकर वर्गा कडून त्रास संभवतो. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल.


तूळ - आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. 


वृश्चिक - आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. 


धनु - आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही.  कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद - विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांचा अत्यंत दक्षपणाने सामना कराव लागेल. 


मकर - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. कामाच्या ठिकाणी आपली प्रशासकीय बुद्धिमत्ता दुर्लक्षित होईल. 


कुंभ - आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. 


मीन - आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies