आटपाडी : तालुक्यातील उंबरगाव येथे भीम आर्मीच्या संविधान रक्षक दल शाखेचे उदघाटन, भीम आर्मीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा संघटक, जगन्नाथ वाघमारे, तालुका संपर्क प्रमुख, अर्जुन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष दामोदर बुधावले, सुनिल गाढवे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाखाप्रमुख म्हणून किसन वाघमारे याची निवड करण्यात आली. तर अमित सावंत, सारंग सावंत, विश्वास सावंत, ऋषिकेश एवळे, बबलू वायदंडे, मोहन चव्हाण, जगन्नाथ सावंत, शैलेश सावंत यांची संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाची आभार दौलत बुधावले यांनी मानले.