विवाहितेने भावाला गुडबायचा मॅसेज केला अन दोन लहान मुलासह...!बुलडाणा - तालुक्यातील धाड नजिकच्या करडी येथील गावातील रहीवाशी असलेल्या एका 30 वर्षीय विवाहीतेने आपल्या दोन लहान मुलासह करडी धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील मृतक महीलेचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगुन आला असुन तिच्या सोबतच्या दोन मुलांचा शोध नागरिक आणि प्रशासन घेत आहे.शरद दामोदर वय 35 रा.फरदापुर ता.सोयगाव जि.औरंगाबाद यांनी धाड पोलीसात तक्रार दिली आहे की त्यांची बहीण मृतक नामे सरीता हीचा विवाह करडी येथील ज्ञानेश्वर पैठणे यांच्याशी 2011 मध्ये झाला होता, दरम्यान ते दोघे रोजगाराच्या निमित्ताने औरंगाबाद याठिकाणी होते मात्र मागील एका वर्षांपासून ते आपल्या गावी म्हणजे करडी गावात राहत होते.


घटनेच्या दिवशी 27 जुलै रोजी साधारण रात्री भावाच्या मोबाईल वरती सरीता पैठणे यांनी "गुडबाय आम्ही जग सोडुन जातोय" तसेच कपाटातील रजिस्टर पोलीस काकांना द्या ....अशा आशयाचा मेसेज त्यांनी काल सकाळी 6 वा दरम्यान बघीतला आणि आपल्या बहीणीला मोबाईल वरुन संपर्क साधला असता तीचा मोबाईल वर त्यांचे दाजी ज्ञानेश्वर विश्वनाथ पैठणे यांचेशी बोलणे झाले तेंव्हा सरीता जवळ फोन द्या असे म्हंटल्यावर त्यांनी सरीता आणि भाची वैदीका वय 11 ,व भाचा वंश वय 9 यांच्यासह सकाळी अंदाजे 5:00 वा.पासून घरातून कुणालाही न सांगता निघुन गेल्याचे सांगितले.यानंतर सौ सरिता यांच्या भावाने तातडीने करडी गाव गाठुन धाड गावात त्यांचा शोध घेतला, नातलगांना विचारणा केली मात्र कुठेही शोध लागला नाही. शेवटी फीर्यादी यांनी धाड पोलीसात जाऊन यासंदर्भात माहिती दिली असता पोलिसांनी त्यांना सरीताचे प्रेत करडी धरणाच्या पाण्यावर आढळून आल्याची माहिती दिली.


तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता सरीता ज्ञानेश्वर पैठणे यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.भाऊ शरद दामोदर यांनी बहीणीच्या घरातील कपाटातून रजिस्टर काढुन पोलिसांना दिले त्यामध्ये मृतक सरीताने आपला पती ज्ञानेश्वर हा आपल्या चारीत्र्यावर संशय घेतो यावरुन तो सतत मारहाण करत असतो तथा पतीची बहीण शिला व सासु सातत्याने माणसिक त्रास देऊन मृतक हीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले असल्याचे रजिस्टर मध्ये नमुद असुन यासंदर्भात अनेक गोष्टी चा उल्लेख मृतक हीने करुन ठेवला आहे.या प्रकरणी धाड पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल पाटील तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. शरद दामोदर यांच्या फीर्यादी वरुन पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्यापही करडी धरणाच्या पाण्यात त्या दोन्ही मुलांची शोध मोहीम नागरिकांच्या वतीने सुरु आहे.(सौ.साम)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured