Type Here to Get Search Results !

मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना मिळणार मंत्रिपद?



बीड: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. या मंत्रिमंडळात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी बीड ते मोहटा देवी पायी दिंडी काढत मुंडे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी साकड घातले.



नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे यासाठी बीड येथील भाजपच्या महिला आघाडीने पदयात्रा काढली. मोहटा देवीला साकडे घातले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त आहे. बीड शहरातील भाजपच्या ७५ महिला कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी बीड ते मोहटादेवी ७२ किलोमीटर पदयात्रा काढली.


दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये डावलले जात असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून समर्थक करत आहेत. आता मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा समर्थकांनी व्यक्त केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies