Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार ९ जुलै २०२२: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:- अतिविचार करू नका. नसत्या वादात लक्ष घालू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मानसिक व्यग्रता जाणवेल. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नका.


वृषभ:-

वेळेचे बंधन पाळावे लागेल. लोक तुमच्या स्वभावाकडे आकृष्ट होतील. कौटुंबिक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा होतील. सर्वांशी प्रेमाने संवाद साधाल. घाई गडबडीत कामे उरकू नका.



मिथुन:-

ठामपणे निर्णय घेण्यासाठी मदतीची गरज भासेल. अनाठायी खर्च केला जाईल. मानसिक द्विधावस्थेतून बाहेर यावे लागेल. मनात विचारांचा गोंधळ उडेल. कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल.


कर्क:-

महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. मानभंगाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. कामात चिकाटी आणावी लागेल. लहानशा अपयशाने खचून जाऊ नका.



सिंह:-

कामात त्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली जाईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. जवळचे मित्र भेटतील. तुमच्यातील अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.


कन्या:-

दूरच्या कामातून लाभ संभवतो. अधिकारी मंडळींच्या सल्ल्याने वागावे. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ संभवतो. बोलक्या व्यावसायिकांना चांगला लाभ होईल. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल.



तूळ:-

अचानक धनलाभाची शक्यता. मोठ्या ,प्रतिष्ठित लोकांच्यात ऊठबस राहील. नवीन विचारांनी भारावून जाल. नवीन संधीची कामना कराल. सरकारी कामात अधिक काळ गुंतून पडाल.


वृश्चिक:-

पत्नीच्या मताप्रमाणे जावे लागेल. जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. हातातील कामाला गती मिळेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. त्यांना मदतीचा हात पुढे कराल.



धनू:-

कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.  मनात अनामिक चिंता निर्माण होईल. भुलथापांना भुलून जाऊ नका.  सहकारी तुम्हाला अपेक्षित मदत करतील. कामगारांकडून कामे सुरळीत पार पडतील. 


मकर:-

सुस्वभावी लोकांच्यात वावराल. दिवस आनंदात जाईल. करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन मित्र जोडता येतील.



कुंभ:-

स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. केलेल्या कामाची चोख पावती मिळेल.मानसिक शांतता लाभेल. हित शत्रूंवर मात करता येईल. तुमच्या यशाने विरोधक शांत होतील.


मीन:-

तुमचे कौशल्य पणाला लागू शकते. वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्रासाला कारण ठरू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies