Type Here to Get Search Results !

मोठी बातमी! शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची जिंकली लढाई!




मुंबई :आज एकनाथ शिंदे सरकारने राजकीय पटलावरची आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकली आहे.



आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचे  कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानाने बहुमत चाचणी पार पडली. 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 



दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. नार्वेकर यांना 164 मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधातील राजन साळवी यांना 107 मतं मिळाली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies