Type Here to Get Search Results !

‘येथे’ कोरोनाचा विस्फोट; २३ लाख पॉझिटिव्ह रुग्ण!


लंडन: जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वेगाने वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सर्दी, खोकला आणि सौम्य ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्याचवेळी ब्रिटनमध्ये एका आठवड्यातच कोविड १९ रुग्णांची संख्या जवळपास एक तृतीयांशने वाढली आहे. नवीन कोरोना रुग्णांमध्ये सामान्य लक्षणे आढळून आल्याचे रिपोर्टमध्ये समोर आले. जूनच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास २३ लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे.



एका रिपोर्टनुसार, बहुतांश कोरोना रुग्ण डोकेदुखीने त्रस्त आहेत. ओएनएस डेटानुसार, सन २०२० मध्ये इंग्लंडमध्ये ०.१ टक्क्याहून कमी नागरिकांना कोविड १९ चा संसर्ग झाला. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर २०२१ मध्ये हाच दर १.५७ टक्के इतका होता. आता यावर्षी इंग्लंडमध्ये जवळपास ३.३५ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.



दरम्यान, जूनच्या अखेरीस इंग्लंडमध्ये ८९२८ कोरोनाबाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.४ आणि बीए.५ हे कोरोना रुग्णांच्या वाढीस कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies