Type Here to Get Search Results !

“माझी टिंगलटवाळी करणाऱ्यांचा मी बदला घेणार....”: देवेंद्र फडनविसांचे मोठे वक्तव्य!

 


मुंबई : आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला एकनाथ शिंदे सरकार सामोरे गेले.  विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. 'या सभागृहाने शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला. त्यांचे मी अभिनंदन करतो'. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.



त्यावेळी  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मी तेव्हा कविता केली होती मी पुन्हा येईन... पण तेव्हा माझी काही जणांनी टिंगल टवाळी केली. बघा मी पुन्हा आलो... पण मी यावेळी एकटाच नाही तर, एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो. आता मी माझी टिंगल टवाळी करणाऱ्यांचा बदला घेणार. बदला घेणार म्हणजे त्यांना माफ करणार' अशी जोरदार टोला देवेंद्र फडणवीस लगावला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies