Type Here to Get Search Results !

मुलीला जेवण दिले नाही म्हणून सुनेने केला सासूचा खून!



पुणे : पुण्यात सासूने मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सुनेने सासूचा खून केला. सासूने घरात स्वयंपाक बनवला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळाले नाही. या कारणावरून सासू आणि सुनेत वाद झाला या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले. सुषमा अशोक मुळे (वय 71 रा.पंचवटी सोसायटी,चाकण) असे हत्या झालेल्या सासूचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे (वय 32) असे हत्या करणाऱ्या सुनेचे नाव असून चाकण पोलिसांनी तिला अटक केली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात सतत किरकोळ कारणावरून वाद होत होते. गुरूवारी रात्री मुलीला भाकर न दिल्याच्या रागातून सासू आणि सुनेत पुन्हा वाद झाला. हा वाद वाढत  गेल्याने, सुनेने  नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध झाल्या. काही वेळानंतर सुषमा यांचा मुलगा सागर हा कामावरुन घरी आला. त्यानंतर तिने पतीला सासू फिट येऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले. त्यानंतर  सागरने आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला होता.



दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांना हा खून असल्याची शंका आली असता, त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती चाकण पोलिसांना दिली. पोलिसांनी सुषमा यांचा मुलगा सागर आणि सून सुवर्णा यांची कसून चौकशी केली असता, आपणच सासूचा खून केल्याची कबूली सुवर्णा हिने दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies