Type Here to Get Search Results !

बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी बोलावली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक; बैठकीला विरोध?



हिंगोली: शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. 



परंतु, तरिही त्यांनी शिवसैनिकांना आज, शनिवारी बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले. याविरोधात शिवसेनेचे हिंगोली, नांदेड, बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी प्रसिद्धीपत्रक काढत शिवसेनेने अशी कोणतीही बैठक बोलावली नसून बैठकीला जाऊ नये असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. 


त्यामुळे नक्की कुणाचा आदेश मानायचा अशा पेचात हिंगोलीतले शिवसैनिक पडले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies