Type Here to Get Search Results !

‘येथे’ निळे आकाश अचानक झाले हिरवे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!



साउथ डकोटा:  अमेरिकेच्या साउथ डकोटा येथे निळेशार असणारे आकाश काही क्षणातच अचानक हिरवे झाले. सुमारे 400 किलोमीटरपर्यंतच्या आकाशाने अचानक हिरवा रंग धारण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  साउथ डकोटा राज्यातील काही भागात 160 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. वादळापूर्वी आकाशाचा हिरवा रंग ही एक विलक्षण घटना असल्याचे म्हटले जात आहे. साऊथ डकोटा वाहतूक विभागाच्या कॅमेऱ्यांमध्येही ही घटना कैद झाली आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 



हवामान शास्त्रज्ञ पीटर रॉजर्स म्हणाले की, वादळाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले कारण आकाश हिरवे झाले होते आणि हा रंग देखील स्वतःमध्ये खूप खास आहे. येत्या काळातही आकाशाचा हा हिरवा रंग चर्चेचा विषय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रॉजर्स म्हणाले की वादळाच्या वेळी आकाशाचा रंग असामान्यपणे बदलतो. सूर्यप्रकाश कसा आहे आणि वातावरणात विविध घटक कसे विखुरले जातात यावर रंग अवलंबून असतो. हे अतिशय विलक्षण आहे. कधी आकाशाचा रंग जांभळा तर कधी पूर्णपणे काळा असू शकतो.


दरम्यान,  मुसळधार पावसाच्या दरम्यान किंवा वादळाच्या दरम्यान आकाशाचा हिरवा रंग सूचित करतो की काही वेळाने गारा देखील पडू शकतात. सुमारे 45 मिनिटे 160 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती कठीण झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies