Type Here to Get Search Results !

मुलीला शाळेत सोडायला जाताना बाप-लेकीचा अपघात; अपघातात दोघांचा जागीच मृत्यू!



पुणे - सासवड रस्त्यावर मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  पुणे-सासवड रोडवर मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना बाप व  लेकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. व मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) आणि मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू झालेल्याची नवे आहे. मीनाक्षी ही साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर येत आहे.



दरम्यान, सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies