आटपाडी : चिंचाळे मध्ये वृद्धेस मारहाण करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने केले लंपासआटपाडी : आटपाडी तालुक्यात चोऱ्यांचे सत्र वाढले असून चिंचाळे येथे वृद्ध महिलेला मारहाण करत अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने चिंचाळे सह खरसुंडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, चिंचाळे येथे कोंडाबाई कुंभार (वय ८८) या राहणेस आहेत. दिनांक १५ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कोंडाबाई यांना तुझे जवळचे दागिने दे असे म्हणत दमदाटी केली.


तसेच चोरट्याने कोंडाबाई यांना मारहाण करत त्यांच्या कानातील २० हजार रुपयांचे सोन्याचे फुले, २० हजार रुपयाची सोन्याची मणी असलेली माळ व त्यांच्या जवळील मोबाईल घेवून कोंडाबाई यांना घरामध्ये कोंडून पळून गेला. या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पीएसाय पाटील अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured