Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न!



पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.



या वर्षी कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने वारीला परवानगी दिली होती. त्यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह दुणावला होता. आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली आहे. यंदा मानाचा वारकरी म्हणून मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला.यंदा मंदिर प्रशासनाने आषाढी एकादशीसाठी जय्यत तयारी केली आहे.



दरम्यान, संत ज्ञानेश्वर माऊली, रुक्मिणी पालखी, संत एकनाथ महाराज, संत सोपनकाका, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आदी या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies