Type Here to Get Search Results !

प्राध्यापक महिलेला चिरडले डंपरने; अपघातात महिला जागीच ठार!



पुणे: पुण्यात आज सकाळी ९ वाजता सिंहगड रोडवर दुचाकीवरून कामावर निघालेल्या एका प्राध्यापक महिलेच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वृषाली तुषार थिटे असे मयत प्राध्यापक महिलेचे नाव आहे.या अपघातानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  वृषाली थिटे या नऱ्हे मध्ये असणाऱ्या झील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे त्या  आज सकाळी कामावर दुचाकीवरून निघाल्या असता, वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल शेजारी असलेल्या शिंदे मैदानाजवळ त्या आल्या यावेळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे त्या खाली पडून चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.



दरम्यान, या अपघातानंतर डंपरचालक फरार झाला असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies