Type Here to Get Search Results !

एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी तगादा लावल्याने युवतीची आत्महत्या!



यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी तगादा लावल्याने एका अल्पवयीन युवतीने पूस नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. प्रीती अजय जगझाप (१५, रा. वलबाबा वॉर्ड, पुसद) असे मृत अल्पवयीन युवतीचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मृत प्रीती हिच्यावर तुकाराम बापू वॉर्डातील रहिवासी शुभम राजू घड्याळे (२१) याचे एकतर्फी प्रेम होते. त्यातूनच तो प्रीतीच्या मागे लग्नासाठी तगादा लावत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी प्रीतीने दुपारी २ वाजताच्या सुमारास पूस नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली.



दरम्यान, लोकांच्या मदतीने पोलिसांनी प्रीतीचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies