Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा!



आटपाडी:   दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व नेमके काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 26 जुलैचे दिनविशेष.



कारगिल विजय दिवस

कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. 



1509 : विजयनगर साम्राज्य 

दक्षिण भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते.



1745 : पहिला महिला क्रिकेट सामना

26 जुलै 1745 साली पहिला महिला क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. गिल्डफोर्ड, इंग्लंड येथे पहिला क्रिकेट सामना रंगला होता.



1892 : दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले सदस्य म्हणून निवडून आले. 

26 जुलै 1892 साली दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले सदस्य म्हणून निवडून आले. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. 


2005 : मुंबई ढगफुटी 

26 जुलै 2005 रोजी मुंबईत झालेला पाऊस ही ढगफुटी होती. आज या घटनेला 12 वर्षे झाले आहे.  26 जुलै रोजी सातत्याने पाऊस कोसळत होता. मुंबईसह सर्वच परिसरात पावसाने जोर धरला होता. रस्त्यांवर पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेकांच्या गाड्या रस्त्यात बंद पडल्या, तर काहींनी भररस्त्यात गाड्या सोडून चालत घर गाठणं पसंत केलं. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वेमार्गावरील लोकल वाहतूक ठप्प होती. 



2008 : अहमदाबाद बॉम्बस्फोट

26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटं आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.



1927 : गुलाबराय रामचंद्र यांचा जन्मदिन

गुलाबराय रामचंद्र हे भारतीय क्रिकेट खेळाडू होते. 26 जुलै 1927 रोजी त्यांचा जन्म झाला तर 8 सप्टेंबर 2003 रोजी त्यांचे निधन झाले. 


1986 : मुग्धा गोडसे यांचा जन्म


1994 : पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्मदिन


2015 : बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies