Type Here to Get Search Results !

सोन्या -चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा भाव!



नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी सकाळी पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 



MCX वर सोन्याचा वायदे भाव 170 रुपयांनी वाढून 50,670 वर पोहचला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्याच्या किंमतीत उसळी दिसू लागली. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोने-चांदी आणखी महाग होण्याची शक्यता आहे. 



सोन्याप्रमाणे आज चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 327 रुपयांनी वाढून 57,053 रुपये प्रति किलो झाला. मागणी वाढल्यानंतर लगेचच चांदीच्या दरात 0.58 टक्क्यांनी वाढ झाली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies