Type Here to Get Search Results !

“पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळू दे” असे म्हणत भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे पायी दिंडीच्या माध्यमातून साकडे!



बीड :  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या सरकारमध्ये कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचे  लक्ष वेधले आहे. अशातच आता  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नवनिर्वाचित सरकारमधील मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळावे. यासाठी आता बीडमधील भाजप महिला आघाडीच्या वतीने, बीड ते मोहटादेवी पायी दिंडी काढण्यात आली आहे. 



आज सकाळी या दिंडीला सुरुवात झाली असून बीड- शिरूर कासार - मोहटादेवी अशी पायी दिंडी काढण्यात येत आहे. दरम्यान आम्हाला विश्वास आहे, या सरकारमध्ये नक्कीच पंकजा ताईंना मंत्रिपद मिळेल. आणि हीच भावना घेऊन साकड घालण्यासाठी, आम्ही बीडहून मोहटा देवीला पायी दिंडीच्या माध्यमातून जात आहोत. असे प्रतिक्रिया बीडच्या भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संगीता धसे यांनी दिली आहे.


दरम्यान, भाजपकडून मुंडे भगिनींना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies