Type Here to Get Search Results !

२५ वर्षीय महिलेची गळा कापून हत्या!



मुंबई: मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी परिसरात एका २५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ती ८ दिवसांपूर्वी याच इमारतीत दोन व्यक्तींसोबत कामासाठी आली होती.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, या महिलेच्या गळ्यावर वर्ण आहेत, वर्ण पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. या महिलेसोबत असणारे दोन व्यक्ती राजीव उर्फ सुनाई व राजू शेख हे ही तिथे आढळून आले नाहीत. तपासात दोघेही मागील दोन दिवसांपासून कामावर येत नसून फोनही बंद येत असल्याने या दोघांनी तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे.


दरम्यान, या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies