Type Here to Get Search Results !

धक्कादायक: नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या घरात चोरट्यांनी पैशासह दागिने लंपास



सांगली : मोरे हे ड्युटीवर पोलीस ठाण्यात असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेऊन मोरे यांचा पहिल्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सहा तोळे सोने आणि तीन हजार रोख रुपये चोरले. त्यानंतर त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या पूजा खाडे यांच्या घराचे लॉक तोडत घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.


चोरट्यांनी पोलिसांच्या दोन फ्लॅटमध्ये चोरी करुन सुमारे आठ तोळे सोने आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल चोरला आहे. 


ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुपवाड रस्त्यावरील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये घडली. या दोन्ही चोरीची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies