Type Here to Get Search Results !

पोलीस भरतीची तयारी करताना २३ वर्षीय युवकाचा मृत्यू!


हिंगोली : हिंगोली शहरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे . संघपाल नरवाडे असे मयत तरुणाचे नाव असून तो वसमत शहरातील रहिवासी होता.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, संघपाल गेल्या काही दिवसापासून दररोज हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर आपल्या सहकारी मित्रांसोबत पोलीस भरतीची तयारी करत होता.त्यावेळी, आज सकाळी मैदानावर धावत असताना संघपाल अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला.



दरम्यान, त्याच्या मित्रांनी संघपालला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी संघपालला मृत घोषित केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies