Type Here to Get Search Results !

हॉटेलमध्ये जॉब असल्याचे सांगत २४ वर्षीय तरुणीवर केला बलात्कार!



नागपूर : नागपूर  शहरात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.  अंबाझरी पोलिसांनी आरोपी नीलेश योगेश्वर हेडाऊ या संशयिताला अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  अंबाझरी येथे राहणारी २४ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात बहिणीसह सीताबर्डी येथे आली होती. दोघी बहिणी मोरभवन बसस्थानकावर नोकरीबाबत चर्चा करत होत्या. त्याच्याजवळ उभ्या असलेल्या आरोपी नीलेशने त्याचे बोलणे ऐकले आणि आपल्याकडे नोकरी असल्याचे आमिष त्यांना दाखवले. स्वत:ची ओळख हॉटेल मालक अशी करून दिली. आरोपीने तरुणीकडून मोबाइल क्रमांकही घेतला.



संशयित आरोपी नीलेशने तरुणीला फोन करून गणेशपेठ बसस्थानकावर बोलावत तिला एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिज म्हणून जॉब आहे. त्याच्या मुलाखतीसाठी जायचे आहे. त्यानंतर तरुणीला भंडारा येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिथे मुलीवर जबरदस्ती केली. नीलेशने तिला पुन्हा घरात नेऊन अत्याचार केला.तसेच, रात्रभर डांबून  ठेवल्यानंतर आरोपीने तरुणीला गणेशपेठ बसस्टँडजवळ सोडत झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला ठार मारीन म्हणून धमकावले. 



दरम्यान, घरी आल्यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी नीलेश हेडाऊला अटक करण्यात आली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies