Type Here to Get Search Results !

तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या!



धुळे : शिरपूर शहरातील रामसिंग नगर येथील रहिवासी हर्षल भिका माळी या युवकाने रात्री घरात झालेल्या किरकोळ वादातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.



प्राप्त माहितीनुसार,  रामसिंग नगर येथील हर्षल माळी याची कुटुंबियांसमवेत रात्री अकरा वाजता किरकोळ वाद झाला. या वादाचा राग मनात धरत त्याने थेट आपल्या डोक्यात पिस्तूलने गोळी झाडली. घरच्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हर्षलला तात्काळ शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सूचनेनुसार तात्काळ हर्षलची परिस्थिती बघत त्याला धुळे येथील हिरे वैद्यकीय शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी हर्षलला तपासून मृत घोषित केले.



दरम्यान, या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies