Type Here to Get Search Results !

शिवसेनेला धक्का! ‘या’ शिवसेना उपनेत्याचा शिंदे गटात प्रवेश!



जालना : शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीने कसून चौकशी केली असून कारखान्याची मालमत्ता, जमीन यंत्र सामग्री सील केली आहे. त्यामुळेच खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या रडारवर काही दिवसांपूर्वीपासून अर्जुन खोतकर होते. अर्जुन खोतकर यांच्या घरासह त्यांच्या नातेवाईकांची देखील कसून चौकशी करण्यात आली होती. 


दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांना पेढा भरवून त्यांचे शिंदे गटात स्वागत केले आहे. दोन दिवसांपूर्वीच खोतकर यांनी आपण ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असून शिंदे गटात कधीही जाणार नाही असा दावा केला होता. मात्र आज शिंदे गटात खोतकर यांनी प्रवेश केल्याने हा जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies